पुणे, दि २८ : भारतीय तिबेट पोलीस दलातील कॉन्स्टेबल (स्वयंपाक सेवा) गट ‘क’ अराजपत्रित (अ-मंत्रालयी) तात्पुरत्या आधारावर रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक असून शैक्षणिक पात्रता १० वी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून अन्न उत्पादनातील एनएसक्यूएफ स्तर- १ अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
या पदासाठीचे अर्ज उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर करावेत. वयातील सवलत, पात्रता अटी, ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया, भरती प्रक्रिया, चाचण्या आणि वेतन आणि भत्ते याविषयीची तपशीलवार माहितीदेखील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 2 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध राहणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.