पुण्यातील लग्जरी लाइफस्टाईलचे ठिकाण- (कोपर) कोपामध्ये या 24 आणि 25 ऑगस्ट 2024 रोजी “द स्टाइल वॉर्डरोब” च्या सहकार्याने “द लक्झरी हब” हा प्रीमियर फॅशनचा मेळा भरविण्यात येणार आहे.
नाजूकपणे तयार केलेल्या ‘चिकनकारी सलवार’ आणि स्टायलिश ‘कॉर्ड सेटपासून’ ते ‘स्फटिक-भरतकाम’ केलेले शर्ट आणि आकर्षक प्’रेट कलेक्शन’पर्यंत, सगळे भेटेल!
दागिने आवडणाऱ्यांनी विविध प्रकारचे हिऱ्यांचे प्रकार पाहून आपली निवड करू शकतात.
खास फुटवेअर विभाग येथे असून, कोणत्याही पोशाखाला योग्य फुटवेअर येथे मिळेल.
लक्झरी हबमध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ आणि पुण्यातील प्रमुख नावांसह भारतभरातील बुटीक ब्रँड्स असतील. द बुझी बटन, नायाब इंडिया, मोहिनी रजनी डिझाइन्स आणि हाउस ऑफ फेटसारखे डिझायनर त्यांच्या नवीन कलेक्शनसह पदार्पण करतील. त्यामुळे खरेदीसाठी वेगळी पर्वणी ठरेल. या मेळ्याला आंतरराष्ट्रीय परिमाणही जोडले गेले आहेत.
या मेळ्यात स्टाईल वॉर्डरोबद्वारे निवडलेले जागतिक स्तरावर प्रेरित कलेक्शनही प्रदर्शित करेल, ज्यामध्ये आग्नेय आशिया आणि यूएसमधील निवडींचा समावेश आहे. गुलनाझ अमीन, लेबल कोकोप्लम, एसडब्ल्यू फूटवेअर, दातुरा फूटवेअर आणि ऑरिक ज्वेल्स यांसारख्या ब्रँड्सकडे लक्ष असू द्या.
पुणेकरांसाठी हा केवळ खरेदीचा मेळा नाही, तर फॅशन आणि लाइफस्टाईलमधील सर्वोत्तम गोष्टींचा अनुभव घेण्याचे एक ठिकाण आहे. ट्रेंडच्या पुढे राहण्याचा विचार करणाऱ्या व फॅशनची आवड असणाऱ्यांनी या ठिकाणी आवश्य भेट द्यावी, असा हा मेळा असेल.