पिंपरी, पुणे (दि. २६ ऑगस्ट २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये ‘आयडिया जनरेशन इनोव्हेशन’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि उत्कटता या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेच्या इनोव्हेशन लॅब मध्ये अत्याधुनिक कल्पना आणि त्याचे तांत्रिक सादरीकरण केले असे प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी नवकल्पकांनी पर्यावरणपूरक आविष्कारांपासून परस्परसंवादी डिजिटल कला आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी डिझाइनपर्यंतच्या वास्तविक-जगातील समस्यांवर उपाय प्रदर्शनात सादर केले. यामधे “सौर उर्जा सायकल” प्रकल्प कौतुकाचा विषय ठरला. विद्यार्थ्यांनी कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यासाठी डिझाइन केलेले टिकाऊ ऊर्जा वापर महत्त्वाचा घटक ठरला. वाहनांच्या ऑटोमेशनसह सौर तंत्रज्ञानाचा समावेश करणारा हा प्रभावी प्रकल्प, त्याच्या व्यावहारिक उपयोगासाठी उपयुक्त ठरू शकतो. या प्रकल्पाने विद्यार्थी व पालकाचे लक्ष वेधून घेतले.
दुसऱ्या संघाने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असे पीक कापणी मशीन सादर केले. या मशीनच्या साहाय्याने झटपट कापणी करता येते. शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. सर्वसामान्यांचे दैनंदिन आणखी सुखकर करण्यासाठी सर्वसमावेशक विचार करून प्रकल्प सादर केले होते.
इनोव्हेशन लॅब प्रमुख वर्षा देशमुख तसेच आकांक्षा गोस्वामी, मंदाकिनी गवळी, मंजूषा शिरसकर. उप प्राचार्या पद्मावती बंडा, उप मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, समन्वयिका वंदना सांगळे यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.