उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
अहमदनगर, २२ ऑगस्ट – महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी अहमदनगर दौऱ्यावर असून, यावेळी अहमदनगर पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी उपसभापती यांची भेट घेतली. यावेळी पोलीस विभागातील वर्तमान बाबींचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी घेतला.
अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल ही कार्यान्वित असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्याचा वापर व्हावा या दृष्टीने आठवड्यातील ठराविक दिवस ऑनलाईन पद्धतीने तालुकास्तरीय नियोजन करण्याच्या सूचना यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून किंवा डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत देखील सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक श्री.ओला यांना केले.
नवीन दंडसहिंतेसंदर्भात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण व जागृती करण्यात याव्यात .
अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक यांना यावेळी केली.