पुणे- अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगाराकडुन एकुण ७,००,०००/- रू.किमतीचे ३२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे फरासखाना पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १४/०८/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार साहिल शेख यांना मिळाले माहितीवरून दिशा जिन्स शॉप समोर, मिरादातार दर्गा रोड, रविवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सागर जयसिंग चव्हाण, वय ३४ वर्षे, रा. १०९०, गायत्री भवन शेजारी, रविवार पेठ, पुणे याच्या ताब्यात एकुण ७,००,०००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ६,४०,०००/- रु.किं.३२ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), हा अंमली पदार्थ व इतर ऐवज असे बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने पोलीस अंमलदार साहिल शेख यांनी त्याचेविरुध्द फरासखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १६३/२०२४ एन.डी. पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), अन्वये दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार साहिल शेख, अझीम शेख, चेतन गायकवाड, रविन्द्र रोकडे, संदिप जाधव, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, निलम पाटिल, यांनी केली आहे.