पिंपरी चिंचवड विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
पिंपरी, पुणे (दि. १६ ऑगस्ट २०२४) – आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास करून रोजगार, स्वयंरोजगार संधी शोधल्या पाहिजेत. यामुळे देश विकासाला चालना मिळेल आणि गौरव वाढेल. विद्यार्थ्यांनी सचोटी आणि निस्वार्थीपणाची मूल्ये जोपासली पाहिजेत, असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर (निवृत्त) विवेक कामत केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कामत यांनी सर्वांना ‘नेशन फर्स्ट’ चे महत्व सांगितले. कार्यक्रमास रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे ब्रिगेडियर (निवृत्त) जयप्रकाश सपटणेकर, प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते.
सपटणेकर यांनी उपस्थितांना राष्ट्रसेवेत समर्पण आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. डॉ. मणिमाला पुरी यांनी देशासाठी सैनिकांची प्रेरणा आणि त्यांचे बलिदान याविषयी माहिती दिली. डॉ. थेपडे यांनी सत्यमेव जयतेचा मंत्र देऊन राष्ट्र आणि सर्वांप्रती प्रामाणिकपणाची भावना निर्माण केली.
यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादरीकरण करत लष्कर आणि जवानांप्रती आदर व्यक्त केला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयु सल्लागार सदस्य हुसेन हाजीते यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या