Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी जोमाने काम करा: नाना पटोले

Date:

प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक टिळक भवनमध्ये संपन्न.

मुंबई, दि. ३० जुलै २०२४
भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करत आहे. भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्याचे काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस व इंडिया आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभेची निवडणूक तीन महिन्यावर आली आहे, लोकसभेत चांगले यश मिळाले म्हणून गाफील राहू नका विधानसभा निवडणुकीसाठीही मेहनत करा, जनतेपर्यंत जा व काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी काम करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरातील विविध पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केली व राज्यात महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत दलित, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक समाज, महिला, तरुणांचा कौल इंडिया आघाडीला मिळाला व आता राज्यातही परिवर्तन व्हावे ही जनतेची भावना आहे, आपण जनतेपर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्यांची दखल देऊन त्यांना योग्य ती संधी दिली जाते, पक्षासाठी काम करा व विधानसभेवर काँग्रेसच्या विजयाची पताका फडकवा असेही नाना पटोले म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला

मुळशी खोरे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रेरणाभूमी-ज्येष्ठ नेते शरद...

भाजपच्या ओमकार कदम आणि सहकाऱ्यांवर अखेर पोलिसात गुन्हा दाखल

पुणे -महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास...

एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या ताफ्याचा मोठा अपघात:सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातान बोगद्याजवळ मंगळवारी सकाळी एक मोठा...