मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अभियंता संतोष पाटणी यांनाही पुरस्कार
पुणे, दि. १९ जुलै २०२४:सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महावितरणने मोठा वेग दिला आहे. वीजग्राहकांसह सौर प्रकल्पांच्या एजन्सीजना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सरकारी धोरणांना अनुसरून सुलभता आणली आहे. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पुणे येथील ‘सूर्याकॉन’ परिषदेमध्ये महावितरण, पुणे परिमंडल तसेच मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
देशभरातील सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्या व प्रतिनिधींची ‘सूर्याकॉन’ परिषद पुणे येथे गुरुवारी (दि. १८) आयोजित करण्यात आली. यामध्ये सन २०२४ चे वार्षिक सौर पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात ‘मोस्ट प्रोग्रेसिव्ह युटीलिटी ऑफ इअर’चा पुरस्कार महावितरण कंपनीला, ‘पॉलिसी एक्सलेंस अवार्ड फॉर मोस्ट इफेक्टिव्ह इंप्लिमेंटेशन ऑफ सोलार पॉलीसीज’चा पुरस्कार महावितरणच्या पुणे परिमंडलास तसेच ‘एक्सलेंस इन ग्रीव्हन्स हॅण्डलिंग ऑफ सोलार कन्झूमर्स ॲण्ड व्हेंडर्स’चा पुरस्कार मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना आणि ‘एक्सलेंस इन पॉलीसी अवेअरनेस टू सोलार कन्झूमर्स ॲण्ड व्हेंडर्स’चा पुरस्कार उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांना प्रदान करण्यात आला.
‘सूर्याकॉन’ परिषदेतील विविध चर्चासत्रात यामध्ये केंद्र व महाराष्ट्र शासनाचे अपारंपरिक ऊर्जा धोरण आणि महावितरणचा सहभाग या विषयावर चर्चा झाली. सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सौर प्रकल्पांना देण्यात आलेली गती, कर्मचारी व एजन्सीज प्रतिनिधींचे प्रशिक्षण, ग्राहक प्रबोधन, तत्पर सेवा आदींबाबत महावितरणकडून अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. नीलेश रोहणकर व डॉ. संतोष पाटणी यांनी माहिती दिली. तसेच या परिषदेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यासह विविध योजनांची प्रदर्शनी व ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली.
महावितरणने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात देशात मोठी आघाडी घेतली आहे. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने घरगुती ग्राहकांसाठी जानेवारी २०२२ ते २४ या दोन वर्षांतील १०० मेगावॅटचे उद्दिष्ट चार महिने आधीच पूर्ण केले आहे. पुणे परिमंडलामधील विविध उपक्रमांमुळे सन २०२३ मध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे. तसेच पुणे येथील गणेशखिंड विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला छतावरील ६० किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचा राज्यातील हा पहिला प्रकल्प आ