विरोधकांच्या मतदार संघात  ‘विकास-निधी’ मिळत नसेल..  तर ‘सविनय कायदेभंग व असहकार आंदोलनाची’च गरज..!

Date:

काँग्रेस चा इशारा..!
⁃विकास निधी देत नसल्याचा ‘फुटीर खासदारांच्या आरोपा’ने भाजप-एनडीए’ची पोल खोल..! 
 ‘विकास_निधी नसलेल्या मतदार संघातील’ नागरिकांनी, कोणतेही सरकारी कर न भरण्याची भुमिका घ्यावी काय..? 
         – वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी 
पुणे दि २५ जुन 
महाविकास आघाडी’च्या जाहीरनामा व ध्येय – धोरणांवर’ व प्रस्थापित मोदी सरकार’च्या विरोधात मतदान करून, जनतेने निवडून दिलेल्या खासदारांचा ‘भाजप-महायुती प्रवेश’ हा तेथील जनतेशी विश्वासघात व प्रतारणा असून.. संबंधित मतदार संघातील खासदार हे माध्यमांचे समोर, त्यांना ‘विकास निधी मिळत नसुन कामे होत नसल्याची’ कारणे देत पक्षांतर केल्याचे.. समर्थन करणे हे ‘सत्ताधाऱ्यांची पोल खोल असुन, भाजप – एनडीए कडून संबंधित मतदार संघातील जनतेप्रती सुड उगवण्याचा निंदनीय प्रकार असून, असंविधानक देशद्रोही कृत्य असल्याची कठोर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निवेदनाद्वारे केली. 

ते पुढे म्हणाले की,  एकीकडे सरकार म्हणते सबका साथ, सबका विश्वास मात्र कृतीतून सत्ताधारी पक्ष हा सापत्नपणाची वागणूक देत असल्याचे सांगीतले.
संबंधित मतदार संघातील जनतेने, निवडणूकीद्वारे भाजप-महायुती विरोधात मतदान करून, सत्तेवर जाण्यासाठी ‘पर्यायी पक्ष व लोकप्रतिनिधींची निवड करण्याची स्पष्ट पसंती मतदानाद्वारे दर्शवली असून’ लोकशाहीचे कर्तव्य बजावले आहे. 
दुसऱ्या अर्थाने, तेथील जनतेने दर्शविलेल्या पसंती नुसार व केलेल्या मतदानानुसार संबंधित पक्ष सत्तेवर न येऊ शकल्यास, तो पक्ष वा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सत्तापक्षाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याचे, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे, व सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे कर्तव्य चोख बजावतील याच अपेक्षेने तेथील मतदारांनी कौल दिला असल्याचे स्पष्ट आहे..! 
ते पुढे म्हणाले की,  महाराष्ट्रातील जनतेने, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडी’ (३१) तर भाजप एनडीए (१७) जागी निवडून दिल्याने..  राज्यात भाजप महायुती विरोधी कौल स्पष्ट केला आहे. मात्र तरीही अशा प्रकारे ‘विरोधी खासदारांच्या’ मतदार संघात “विकास निधी न देणे” हे केवळ तेथील जनतेच्या सुड उगवण्या पुरते मर्यादित नसून देशात.. प्रथम क्रमांकाने राष्ट्रीय महसुल व जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्र विरोधी द्रोह असल्याची प्रखर टिका देखील महाराष्ट्र काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. 
*देशात सर्वाधिक महसूली उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या वाट्यास, विकास निधी न देण्याची’ सापत्नपणाची, आकसाची व खुन्नशी ची वागणूक येत असेल तर काँग्रेस_मविआ ती खपवून घेणार नाही, तर प्रसंगी महाराष्ट्रातील जनता सत्तापक्ष ‘भाजप एनडीए विरोधात’ सविनय कायदेभंग व असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा ही काँग्रेस’चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

पुणे : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट...

काँग्रेसने संविधानाची मोडतोड केली-माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांचे मत

पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची काँग्रेसने...