निषेध, माफी पुरे झाले आता यांचा राजीनामा घ्या.. संजय दिनां बद्दल तीव्र संताप ..

Date:

खा. संजय दिना पाटील यांच्या विरोधात पिंपरीत पत्रकारांचे आंदोलन

पिंपरी, पुणे (दि. २५ जून २०२६) पिंपरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेले संजय दीना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीत पत्रकारांनी बुधवारी तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटील यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सर्व पत्रकारांनी केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या या निषेध आंदोलनात
गोविंद वाकडे, नंदकुमार सातुर्डेकर, अविनाश चिलेकर, संतोष मिश्रा, रोहित आठवले, बाळासाहेब ढसाळ, विजय जगताप, अनिल वडघुले यांनी यावेळी खा. संजय दिना पाटील यांचा निषेध करणारी भाषणे केली.
या आंदोलनात मिलिंद कांबळे, विजय जगताप, अमोल काकडे, नरेश नातू, सुरज कसबे, राजेश स्टीफन, अतुल मारवाडी, प्रसन्न तरडे, विकास शिंदे, भानुदास हिवराळे, सुरज कसबे, विश्वजीत पोल्ले, पराग कुंकूलोळ आदींनी सहभाग घेतला होता.
यावेळी गोविंद वाकडे म्हणाले की, संजय दिना पाटील यांचे वक्तव्य निषेधार्ह असे आहे.लोकप्रतिनिधीला ही भाषा शोभत नाही. अशा खासदाराची हकालपट्टी करून राजीनामा घ्यावा.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. महाराष्ट्रात राजकारणात सुसंस्कृतपणा राहिला नाही. एकमेकांना शिव्या देणारे नेते आता पत्रकारांना लक्ष्य करू पाहत आहेत संजय दिना पाटील यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्याहीपेक्षा अधिक टोकाची भाषा आम्हाला बोलता येते. सत्तेच्या मुजोरीतून आपण ही भाषा बोलत असाल तर पत्रकार हे खपवून घेणार नाही असा इशारा सातुर्डेकर यांनी दिला.
अविनाश चिलेकर म्हणाले की, भाजप अशा वाचाळवीरांना पाठीशी घालत आहे.
संतोष मिश्रा म्हणाले की, प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे काम आहे. जीवावर बेतले तरी आम्ही आमचे हे कर्तव्य पार पाडत राहू संजय दिना पाटील यांच्या धमकीला भीक घालणार नाही.
बाळासाहेब ढसाळ म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना झोडून काढले तरच ते वठणीवर येतील.
यावेळी खा. संजय दिना पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

पुणे : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट...

काँग्रेसने संविधानाची मोडतोड केली-माजी केंद्रीय मंत्री डॉ. प्रकाश जावडेकर यांचे मत

पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची काँग्रेसने...