विजापूर-महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर बुधवारी महाराष्ट्र पोलिस दलाने १२ माओवादी नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. या घटनेचा सूड घेत नक्षलवाद्यांनी गुरुवारी पोलिस दलावर हल्ला केला.या हल्ल्यात एसटीएफचे हेड कॉन्स्टेबल भरतलाल साहू (रायपूर) व कॉन्स्टेबल सतेरसिंग (नारायणपूर) हे दोघे शहीद झाले असून पुरुषोत्तम नाग, कोमल यादव, सियाराम सोरी आणि संजय कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बीजापूरच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर हेलिकॉप्टरने पुढील उपचारासाठी रायपूरला हलवण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले.
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील तर्रेम पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान संपवून परत येत असलेल्या जवानांवर केलेल्या आयईडी स्फोटात दोन एसटीएफ जवान शहीद तर चार जखमीझाल्याची घटना पहाटे घडली आहे .
तर्रेम पोलीस ठाणे क्षेत्रात विजापूर दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात नक्षलवाद्यांच्या दरबा पश्चिम बस्तर आणि मिलिटरी कंपनी क्रमांक दोन च्या माओवाद्यांची उपस्थिती असल्याची सूचना मिळाली होती. त्यानुसार एस टी एफ , डी आर जी आणि सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या संयुक्त दलांनी नक्षलविरोधी शोध अभियान सुरू केले पोलिस जवान नक्षल विरोधी शोध मोहीम राबवून परत येत असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा गोळा टाकलेल्या पाईप बॉम्बचा स्फोट करून पोलिसांवर हल्ला केला. गेल्या काही महिन्यांपासून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. यातून अनेक नक्षल्यांना चकमकीत मारले तर काही नक्षली शरण आले होते. या प्रकारामुळे त्यांच्या टोळीत खळबळ माजली.
नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर केला हल्ला: दोन जवान शहिद
Date: