महापालिका मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणासाठी १.४४ कोटींच्या खर्चाला मान्यता – श्रीनाथ भिमाले

Date:

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी तब्बल १.४४ कोटी रुपयांचे काम हाती घेण्यात आले आहे. या खर्चाला पश्चात मान्यता मिळविण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता, त्यानुसार मान्यात दिली असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार, एंट्रन्स लॉबी, सुरक्षा कक्ष, सीसीटीव्ही कक्ष, स्वागत कक्ष, अंतर्गत सजावट, फर्निचर, रंगकाम आणि फरशी बदलण्याची कामे करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी मुख्य इमारतीचा दर्शनी भाग महापालिकेच्या लौकिकास साजेसा करण्याच्या सूचना दिल्यानंतर या कामांची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

भवन विभागाच्या म्हणण्यानुसार, हे काम विशेष आणि विस्तृत स्वरूपाचे असल्याने नियमित देखभाल-दुरुस्तीच्या निविदांमधून ते करणे शक्य नव्हते. तसेच नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्यास मोठा कालावधी लागला असता. त्यामुळे कामाची तातडी लक्षात घेऊन प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

या कामाची मूळ अंदाजित किंमत १ कोटी २९ लाख ५१ हजार रुपये (जीएसटी वगळून) इतकी आहे. त्यावर जीएसटी आणि अन्य खर्च धरून एकूण खर्च १ कोटी ४४ लाख ६१ हजार १७३ रुपयांपर्यंत जाणार आहे.

महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात मुख्य इमारत आणि पार्किंग व्यवस्थेच्या सुधारणा कामांसाठी ६.८० कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या निधीतून संबंधित खर्च भागविला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विरोधकांच्या मतदार संघात  ‘विकास-निधी’ मिळत नसेल..  तर ‘सविनय कायदेभंग व असहकार आंदोलनाची’च गरज..!

काँग्रेस चा इशारा..!⁃विकास निधी देत नसल्याचा ‘फुटीर खासदारांच्या आरोपा’ने...

विकास लवांडे प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांना कारणे दाखवा नोटीस

पुणे : न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई केल्याच्या...

अपघातमुक्त महाराष्ट्रासाठी अवैध वाहतुकीवर कठोर नियंत्रण आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई.दि.२५: राज्यातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होत असलेल्या भीषण अपघातांच्या...