पॅन इंडियाची अभिनेत्री तमन्ना भाटिया ही कमालीची अभिनेत्री आहे यात शंका नाही जिने प्रत्येक उद्योगात यश हे अनुभवलं आहे. तिच्या पदार्पणाच्या अनेक वर्षांनंतरही अभिनेत्री तिच्या भूमिकांच्या योग्य न्याय देते आणि प्रेक्षकांना प्रभावित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली तर अभिनेत्री कशी दिग्दर्शकांची आवडती आहे हे कळून येत.
चित्रपटात तिच्या असल्याने अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सोनेरी कमाई करतो अस देखील म्हंटल जात. ‘जय लावा कुसा’ मधील ‘झुलका जरा’ असो किंवा ‘जेलर’ मधील ‘कावला’ गाणे असो किंवा ‘अरनमानाई 4’ मधील अलीकडचे चार्टबस्टर ‘अच्छाचो’ असो या अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्यांसाठी ती नक्कीच खास आहे हे कळतं.
सध्या ती तिच्या तेलगू रिलीज ‘ओडेला 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा ” वेदा ” नावाचा एक हिंदी रिलीजही पाइपलाइनमध्ये आहे. OTT आघाडीवर, तिच्याकडे ‘डेअरिंग पार्टनर्स’ आणि नीरज पांडेचा एक शीर्षकहीन चित्रपट आहे.