Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पर्वती विधानसभा मतदारसंघात ३० ठिकाणी श्रीनाथ भिमाले आयोजित “मतदार नोंदणी व लाडकी बहीण योजना” नोंदणी अभियानाचा प्रारंभ

Date:

पुणे-राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला १५०० रूपये मिळणार आहेत. याच पार्श्भूमीवर श्रीनाथ भिमाले यांच्यावतीने पर्वती विधानसभा मतदारसंघातील 30 ठिकाणी मतदार नोंदणी आभियान व मुख्यमंत्री लाडकी बहीण अभियान सुरू करण्यात येत आहे.

दिनांक ८ ते १४ जुलै या दरम्यान होणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ सोमवार दि ८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता गजानन महाराज मंदिर,लक्ष्मीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या अभियानाचा शुभारंभ माजी खासदार प्रदिपदादा रावत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलतांना श्रीनाथ भिमाले म्हणाले की ,”मतदार हा कुठल्याही लोकशाही व्यवस्थेचा कणा असतो. भारतीय लोकशाहीमध्ये देखील जास्तीत जास्त लोकांनी मतदार नोंदणी केली पाहिजे. आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यापासून तर विधिमंडळामध्ये बसून कायदे करण्यापर्यंतची सर्व ताकद या भारतीय लोकशाहीमध्ये आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान नोंदणी करून माहिती लोकशाहीचा पाया भक्कम करावा तसेच काही नागरिकांच्या मतदान नोंदणी मध्ये दुरुस्ती देखील करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नागरिकांना मतदान केंद्र शोधणे मध्ये विलंब लागला. मतदारांची ही गैरसोय होऊ नये यासाठी मतदार नोंदणीत दुरुस्ती करणे देखील आवश्यक आहे. राज्यात महायुती सरकारकडून महिला भगिनींसाठी लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी या 30 केंद्रांवर करण्यात येणार आहे. तरी माझे पर्वती विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की, जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवत मतदान नोंदणी व या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा”.
यावेळी सिनेट सदस्य प्रसन्नजीत फडणवीस,माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे,उपाध्यक्ष पुणे शहर राजाभाऊ शेंडगे,माजी नगरसेविका वंदनाताई भिमाले,.पर्वती मतदारसंघ अध्यक्ष हरीश परदेशी,प्रियांका शेंडगे सरचिटणीस युवमोर्चा पुणे,अभिषेक भिमाले सरचिटणीस युवा मोर्चा पुणे रमेश बिबवे,गणेश शेरला,लहू जागडे, अनिल जाधव,संगीता चौरे,किरण वैष्णव .प्रशांत डिकोळे,राजेंद्र काका देशपांडे,अभिजित देसरडा, प्रतीक भिमाले,राजवीर आव्हाड,संतोष भंडारी,सुशील लोंढे,विकास वैरागे,अनिकेत गायकवाड गणेश सुतार आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...