पुणे- पुणे जिल्ह्यात येत्या ३ तासात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज सकाळ पासून पुण्यात हलका पाउस सुरु झाला होता दुपारी 4 वाजता मात्र पावसाने जोर पकडला त्यानंतर मोबाईलवर ऐसेमेस पाठवून पुणेकरांना मुसळधार पावसाबाबत सावध करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी राज्यामध्ये विविध जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.