Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काश्मीरमध्ये लवकरच उभारणार महाराष्ट्र सदन:आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

Date:

mumbai – महाराष्ट्र शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये आता लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.

या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मिर सरकारने बडगाम जिल्हयातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कँनल) जमीन महाराष्ट्र सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे. जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-कशिमर सरकार यांच्यावतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्यादृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कश्या स्वरुपाचे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याच्या नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच कश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहिल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

बडगाम येथे महाराष्ट्र सरकारच्यावतीने बांधण्यात येणा-या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी महाराष्ट्र सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...