विशेष मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

Date:

पुणे- प्रा फाउंडेशन संचालित विशेष मुलांच्या पुनर्वसन केंद्रातील विशेष मुलांची ने आण करणे सुलभ व्हावे व त्यांना त्यांच्या व्हील चेयर सह मोठ्या वाहनात बसता यावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सी एस आर निधीतून वाहन उपलब्ध करून दिले. आज त्या वाहनाचे अवलोकन व विशेष मुलांच्या ह्या केंद्रास भेट देण्यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळ काढला. त्यांच्या समवेत भाजपा चे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रा फाउंडेशन च्या सौ.प्राजक्ता कोळपकर, श्रीप्रसाद देशमुख, मंदार बलकवडे व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी विशेष मुलांनी ना. चंद्रकांतदादांचा वाढदिवस साजरा केला, केंद्रातील एका श्रद्धा नावाच्या व्हील चेयर वरील सेरेब्रल पालसी असलेल्या मुलीने जोरजोरात “बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये, तुम जियो हजारो साल, ये मेरी हैं आरजू ” हे गाणे गायले आणि मग सर्वच विशेष मुला मुलींनी एकसुरात दादांना शुभेच्छा दिल्या…. कोणी दादांचा हात हातात घेत होतं, कोणी सॅल्यूट करत होते, कोणी दादांना औक्षण करत होतं, टिळा लावत होतं, अत्यंत भावनिक आणि शब्दशः प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असा हा आनंद सोहोळा होता.
ह्या मुलांना केवळ सहानुभूती ची नाही तर सक्षमतेने जगविण्याची जिद्द प्रा फाउंडेशन च्या प्राजक्ता कोळपकर यांनी बोलून दाखवली तसेच ह्या विशेष मुलांच्या “आईला एक कडक सॅल्यूट, जी आपल्या विशेष मुलासाठी श्वास अर्पण करते, तिलाही स्वतंत्रपणे जगता आले पाहिजे हा संदेश आम्ही रुजवतोय ” असेही त्या म्हणाल्या. सध्या संस्थेत असलेल्या ह्या 41 मुलांचा सांभाळ करतानाचे अग्निदिव्य ही त्यांनी कथन केले. त्यांच्या ह्या कार्याप्रतीची निष्ठा आणि तळमळ बघून यापुढील कार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महामार्गाच्या कामात वीजवाहिन्यांचे नुकसान; NHAI च्या कामावर महावितरणचा आक्षेप

वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान वारंवार केबलचे नुकसान; कंत्राटदाराविरोधात...

पॅराडाइज इंग्लिश मीडियम स्कूलला २०२६-२७ चा ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’ प्रदान

तब्बल २ हजार ७०१ शाळांमधून ‘पिलर ऑफ व्हॅल्यूज’ या...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यानंतर ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सक्रिय; राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचना !

सामाजिक न्यायमंत्री ना. संजय शिरसाट यांच्या विभागांतर्गत महामंडळाच्या व्यवस्थापकीय...

दिवाळीच्या स्वच्छतेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; कसबा मतदारसंघात तब्बल २० टन घरगुती वस्तूंचे संकलन

आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून कसब्यात अनोखा उपक्रम; २...