Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

५० पेक्षा जास्त हाय इम्पॅक्ट विकास प्रकल्प वेदांताच्या १० अब्ज डॉलर्स ईबीआयटीडीए साध्य करण्याच्या योजनेला बळ देणार

Date:

●       हे प्रकल्प ५ अब्ज डॉलर्सचा संभाव्य फ्री कॅश फ्लो देणार

●       भारतीय अर्थव्यवस्थेतील वेगवान विकास ठरणार विकासाला चालना देणारा मुख्य घटक

●       ब्रोकरेज हाउस नुवामातर्फे टार्गेट प्राइस ६४४ रुपयांपर्यंत अद्ययावत 

वेदांता समूहाचा १० अब्ज डॉलर्स नियर- टर्म ईबीआयटीडीएच्या दिशेने धोरणात्मक योजनेला ५० पेक्षा जास्त उच्च प्रभावशाली विकास प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यातून चालना मिळणार आहे. त्यात झिंक, अ‍ॅल्युमिनियम, ऑइल आणि गॅस व उर्जा व्यवसायातील प्रकल्पांचाही समावेश आहे. वेदांता समूहाने आयोजित केलेल्या साइट व्हिजिटदरम्यान ४५ फंड व्यवस्थापक आणि विश्लेषकांना दिलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशननुसार हे प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. पीटीआयने या प्रेझेंटेशनच्या प्रतीचे परीक्षण केले आहे.

वेदांताच्या अ‍ॅल्युमिनियम व्यवसायाचे प्रकल्प ३.१ एमटीपीए सर्वसमावेशक पुरवठा साध्य करण्याच्या टप्प्यावर आहेत. पहिल्या क्वारटाइलमध्ये जागतिक कॉस्ट कर्व्हमध्ये त्याचा समावेश असून उत्पादन खर्च गेल्या काही वर्षांतील खालच्या टप्प्यावर – १७११/t डॉलर्सवर असून पुरवठा साखळी १०० टक्के व्हर्टिकली इंटिग्रेटेड आहे. कंपनीकडे दमदार व दुप्पट मागणी येत असून देशांतर्गत बाजारपेठ पुढील पाच वर्षांत दुप्पट होणार आहे.

वेदांताच्या झिंक व्यवसायाद्वारे सध्या १.२ एमटीपीए (झिंक धातू) १०००/t डॉलर्स किंमतीत उत्पादन करत असून चांदीचे उत्पादन ८०० एमटीपीए आहे. व्यवसायाचा भारताच्या प्राथमिक झिंक बाजारपेठेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा असून २ एमटीपीएसाठीची विकास योजनेवर काम सुरू आहे.

त्याचप्रमाणे वेदांताचा ऑइल आणि गॅस व्यवसाय स्त्रोतांचा पुढील तीन वर्षांचा >2 बीबीओईपर्यंत (बिलियन बॅरल्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट) विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करणार असून त्याद्वारे ३०० केबीओईपीडीचे (थाउजडंस बॅरल्स ऑफ ऑइल इक्विव्हॅलंट पर डे) उत्पादनाचे ध्येय आहे. त्याशिवाय वेदांता समूहाच्या मोठ्या प्रकल्पाची अमलबजावणी सुरू असून त्यामध्ये लांजीगढ अ‍ॅल्युमिना रिफायनरीची क्षमता ३.५ वरून ५ एमटीपीएपर्यंत नेण्याचे, बाल्को स्मेल्टर ०.६ वरून १ एमटीपीएपर्यंत नेण्याचे आणि एकूण उर्जा उत्पादन क्षमता २.९ जीडब्ल्यू वरून ५ जीडब्ल्यूपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. एकत्रितपणे वेदांता समूह आपल्या सद्य विकास प्रकल्पांमध्ये ८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

काही आघाडीच्या ब्रोकरेज हाउसेसनी याची दखल घेत कंपनीची टार्गेट प्राइस अद्ययावत केली आहे. वेदांताचे प्राइस टार्गेट ६४४ रुपयांपर्यंत अद्ययावत करत नुवामाने आपल्या अहवालात नमूद केले आहे, की ‘आम्ही कामकाजातील प्रभावी कार्यक्षमता, कॅप्टिव्ह अ‍ॅल्युमिनामुळे कमी अ‍ॅल्युमिनियम सीओपी आणि अ‍ॅल्युमिनियम आणि झिंकसाठी उच्च प्रीमियम या घटकांमुळे ५ ते ६ टक्क्यांनी FY25E/26E ईबीआयटीडीए वाढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान कर्जदारांकडून मान्यता मिळाल्यानंतर आर्थिक वर्ष २५ पर्यंत कंपन्यांचे विभाजन होईल. आम्ही VEDL ex-HZ चे मूल्य 6x FY26E EV/EBITDA (आधी ५.५ पट) आणि HZचे सात पटींनी FY26E EV/EBITDA केले असून त्यामुळे ६४४ रुपयांची टार्गेट प्राइस (पूर्वीची ५४२ रुपये) मिळेल.’

त्याशिवाय इन्व्हेस्टेकने त्यांची टार्गेट प्राइस ४७३ रुपयांपर्यंत अद्ययावत केली आहे. सीलीएसएने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात नमूद केले आहे, की अ‍ॅल्युमिना रिफायनरीचा क्षमता विकास, उच्च उर्जा निर्मितीतील कार्यक्षमता, कोल ब्लॉक्स आणि बॉक्साइट खाणींचे सुरू झालेले काम यांसारख्या खर्चातील कपात करणारे व पर्यायाने नफा वाढवणारे विविध उपक्रम रि- रेटिंगसाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

वेदांताची सध्याची मालमत्ता आणि विकास प्रकल्प ५ अब्ज फ्री कॅश फ्लो तयार करेल आणि भागधारकांना शाश्वत परतावे मिळवून देत राष्ट्र उभारणीसाठी मोठे योगदान देतील. १० अब्ज नियर- टर्म ईबीआयटीडीएमध्ये अ‍ॅल्युमिनियमपासून ४.२ अब्ज डॉलर्स, झिंक इंडियाकडून (झिंक आणि सिल्व्हर) २.७ अब्ज डॉलर्स आणि ऑइल व गॅससाठी ०.९ अब्ज डॉलर्स यांचा समावेश आहे.

भारताचे देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) चांगल्या दराने वाढून २०३० पर्यंत ७ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल असा अंदाज एमओएफच्या आर्थिक रिव्ह्यू रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आला असून देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ घेण्यासाठी कंपनीने स्वतःचे स्थान बळकट करण्याचे ठरवले आहे.

कंपनीने व्यवसायांचे व्हर्टिकल विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला असून आणखी पाच कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी केली जाणार आहे. यावर्षाअखेरीस नियामक मान्यता आल्यानंतर ही नोंदणी केली जाणार आहे. योजनेनुसार वेदांता लिमिटेडच्या प्रत्येक शेअरमागे सद्य भागधारकांना पाच नव्याने नोंदवण्यात आलेल्या कंपन्यांचे शेअर मिळणार आहेत. विभाजनानंतर अ‍ॅल्युमिनियम, उर्जा, बेस मेटल्स, ऑइल अँड गॅस, स्टील व फेरस यांसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन केली जाणार असून झिंक आणि इतर सद्य व्यवसाय वेदांता लिमिटेडअंतर्गत कार्यरत राहातील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...