Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

 ‘व्हायोलिन ग्राफी ‘ ला चांगला प्रतिसाद !

Date:

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम 
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित  ‘ व्हायोलिन ग्राफी ‘ या   कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. निनाद निकेतन म्युझिक अकॅडमी प्रस्तुत या कार्यक्रमात  गीत,संगीताचा  सुरेल आविष्कार सादर करण्यात  आला. निर्मिती, संगीत संयोजन अंजली सिंगडे-राव यांचे होते. ओमकार पाटणकर(कीबोर्ड ), विकास क्षीरसागर,नितीन कुलकर्णी (तबला ), अभय इंगळे(रिदम ),प्रसाद साहोत्रे(गिटार) यांनी साथसंगत केली. आर जे तेजू,प्रफुल्ल कुलकर्णी यांनी  कार्यक्रमाचे निवेदन केले.
हा कार्यक्रम शनीवार, दि. १५    जून २०२४ रोजी सायंकाळी ६  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१२ वा कार्यक्रम  होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.
हंस ध्वनी राग, यमन राग अशी प्रस्तुती प्रारंभी करण्यात आली.   ओम जय जगदीश हरे,  आओगे तुम साजना ,तुम मिले,चुरा लिया हैं तुमने अशी  अनेक बहारदार गीते  व्हायोलिन वादनातून सादर करण्यात आली. काही गीतांची झलक दाखविण्यात आली.  जागतिक व्हायोलिन दिनाच्या दोन दिवस आधी केलेल्या या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...