आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेही जंगलात शिरले! कर्जतच्या साई डोंगरावरील वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी सुरू

Date:

टोरेंट पॉवरच्या प्रकल्पाविरोधात राजकीय संघर्ष तीव्र; मनसे अध्यक्ष थेट जंगलात, आजच्या जाहीर सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष

कर्जत, दि. २८ ऑक्टोबर २०२६ | माय मराठी वृत्तसेवा

कर्जत तालुक्यातील साई डोंगरावर टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा वाद आता आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही थेट जंगलात उतरले आहेत.

राज ठाकरे सध्या साई डोंगरावरील वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. या दौऱ्यात मनसेचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

प्रस्तावित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्याने वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला नवे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

आदित्य ठाकरेंनंतर राज ठाकरेही मैदानात

यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी साई डोंगर परिसराला भेट देत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध दर्शवला होता. आता राज ठाकरे यांनीही प्रत्यक्ष जंगलात जाऊन पाहणी सुरू केल्याने पर्यावरणाच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे नेत्यांची भूमिका चर्चेत आली आहे.

‘टोरेंट कंपनी सरकारची जावई आहे का?’ — संदीप देशपांडे

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. दीडशे-दोनशे वर्षे जुनी झाडे तोडून कोणता विकास साधला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वनविभागाने हजारो झाडांच्या वृक्षतोडीला कोणत्या आधारावर परवानगी दिली, ग्रामपंचायतींची भूमिका काय होती आणि जनसुनावणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यात आली का, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे.

आजच्या जाहीर सभेत काय बोलणार?

साई डोंगरावरील पाहणीनंतर राज ठाकरे यांची आज कर्जत येथे जाहीर सभा नियोजित आहे. या सभेत ते टोरेंट पॉवर प्रकल्प, वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या भूमिकेबाबत नेमके काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.

कर्जतच्या जंगलातील वृक्षतोडीचा प्रश्न आता स्थानिक आंदोलनापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर! २१ व्या फेरीनंतर ८,८५२ मतांची आघाडी

विजयाचा कोटा गाठण्यासाठी आणखी १,८१६ मतांची गरज; डॉ. स्मिता...

‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी :पद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम

गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्यपुणे...

शेतकऱ्यांना धमकावून कर्जवसुली केली तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा!

नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या...