पुणे, दि. 15 जून 2024
केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवीन सहकार धोरणाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला समृध्द करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याकडील दोन्ही खात्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या देखील खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील असे स्पष्ट केले .यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.
नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर होणार असून देशभरातील छोट्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहचावा आणि सहकार चळवळ अधिक सक्षम व्हावी यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मोहोळ म्हणाले .
पुण्याजवळील पुरंदर विमानतळ , लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार आणि नवी मुंबई विमानतळ याकडे आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबत काम करणे याचे दडपण आहे परंतु जबाबदारी जाणीव आहे. अमित शाह यांच्या सोबत राष्ट्रीय सहकार धोरण , पुणे विमानतळ बाबत चर्चा केली. कडक हेडमास्तर म्हणून मी त्यांच्याकडे पाहत असून काम अधिक आगामी काळात करावे लागणार आहे. पुण्याचा विकास करणे यास प्राधान्याने न्याय देईल. मला मिळालेल्या खात्याची कामाची माहिती सध्या करून घेत आहे. आता खरी परीक्षा कामाची सुरू झाली आहे असे मत मोहोळ यांनी शनिवारी व्यक्त केले. पुणे मोहोळ म्हणाले, खासदार आणि मंत्री हा कमी दिवसात प्रवास कसा झाला यावर विश्वास बसत नाही. अनेक गोष्टी जीवनात बदलून गेल्या आहे. खूप प्रेम लोकांचे मिळत आहे कारण कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना मोठे पद मिळाले आहे. विमानतळावर आज भव्य स्वागत पाहून मला भारावून आले आहे. कारण कोणता नेता विमानतळावर आले की, त्यांचे स्वागत अनेक वर्ष मी केले. पण पक्षाने संधी दिल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता आज केंद्रीय मंत्री झाला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते यांनी विश्वास दाखवला त्यामुळे विश्वास बसत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्यास दिल्ली मध्ये गेलो. त्यावेळी पक्ष अध्यक्ष जे पी नड्डा यांचा फोन आला आणि त्यांनी तुम्हाला संध्याकाळी शपथविधी घ्यायचा आहे सांगितले. अचानक धक्का बसला त्यामुळे मला विश्वास बसत नव्हता. मोदी यांच्या टीम मध्ये काम करण्याची संधी मिळत आहे ही समाधानाची बाब आहे. आयुष्यातील वेगळा क्षण हा होता कारण पुण्यातून 40 वर्षा नंतर विठ्ठल गाडगीळ यांच्या नंतर केंद्रीय मंत्री पद मिळाले आहे.
सहकार हा महत्वपूर्ण राज्यातील विषय आहे. राज्यात सहकार मोठे जाळे असून देशातील आठ लाख सहकार संस्था पैकी अडीच लाख संस्था राज्यात आहे. ते सक्षम करणे काम यापुढे करण्यात येईल. त्याच सोबत नागरी विमान विभागाचे विविध प्रश्न कामी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील.
तत्पूर्वी आज सकाळी मोहोळ यांचे पुण्यात आगमन झाले . केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आल्याने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. विमान तळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.