पुणे- गंगाधाम चौक येथील काल झालेल्या अपघातात दिवंगत झालेल्या स्वर्गीय दमयंतीताई सोळंकी यांचा भयाण मृत्यू साऱ्या शहराला हादरवून गेला. शहर हळहळले पुण्याच्या खासदार आणि भाजपा नेत्या यांनी कालच तत्क्षणी या अपघाताची दखल घेत आता अशा अपघातांना पोलिसांच्या यंत्रणेतील संबधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई करावी लागेल असा इशारा दिला आणि आज त्यांनी सोळंकी यांचे घर गाठले.अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी आपण सातत्याने प्रशासनावर अंकुश बनून राहण्यासाठी मेहनत घेऊ पुण्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीचे प्रश्न या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पोलीस खाते, महानगरपालिका आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. मी या संदर्भात स्वतः पुढाकार घेणार असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार कुलकर्णी म्हणाल्या,’ गंगाधाम चौक येथील काल झालेल्या अपघातात दिवंगत झालेल्या स्वर्गीय दमयंतीताई सोळंकी यांच्या घरी जाऊन आप्तेष्टांची विचारपूस केली. त्यांच्या भावना इतक्या उद्विग्न होत्या त्या ऐकून माझेही मन हे लावून गेले.
गंगाधाम चौक या ठिकाणी जड वाहतुकीला दिवसा परत बंदी लागू करणे, उताराच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे आणि आवश्यक ती अन्य उपाययोजना करणे तसेच रस्ता रुंदीकरण करून रस्त्यातील अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करणे इत्यादी बाबींवर प्रशासनाशी आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार तसेच DCP राजा यांच्याशी संवाद साधला.पुण्यातील वाढते अपघात आणि वाहतुकीचे प्रश्न या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पोलीस खाते, महानगरपालिका आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. मी या संदर्भात स्वतः पुढाकार घेणार आहे.