पुणे :पुणे लोकसभेच्या निवडणुकीत मी काही लोकांवर विश्वास टाकला तिथेच माझा विश्वास घात झाला, तिथे ज्या पद्धतीने मी तिकीट दिले आणि मोहीम आखली त्याबाबत माझेच समीकरण चुकलेले आहे हे मी कबूल करतो, पण तिथला पराभव माझ्या जिव्हारी लागला. आता या पराभवाचे पोस्टमार्टेम मी करतो आहे, काहींना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, आता हा अहवाल देखील चुकणार नाही याची दक्षता घेतली आहे. आणि पुढे कारवाई देखील होईल असे कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यापुढे विधानसभेला जास्त लक्षपूर्वक इथे निर्णय घेऊन चूक होणार नाही याची दक्षता घेईल असेही पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान पुण्यात अद्यापही स्थानिक पातळीवर पराभव का झाला याबाबतीत कॉंग्रेसची एकही बैठक झालेली नाही. पराभवाची जबाबदारी नेमकी कोणी स्विकारायला हवी यावर देखील मंथन झालेले नाही. जिल्ह्यात कॉँग्रेस एकमेव जागा लढत असतानाहीराहुल गांधी यांनीही मोठ्या अपेक्षेने पुण्यात सभा घेतली होती.कॉंग्रेस ला पूरक असे वातावरण देखील होते तरीही पुण्यात कॉँग्रेसचे उमेदवार धं गे कर यांचा सव्वा लाखाच्या मताधिक्याने पराभव झाला. कॉंग्रेसचा अगदी निश्चित मानला जाणारा विजय भाजपाने खेचून नेला.