१० वर्षात पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाही बळकट करता आली नाही मग केले तरी काय ? फक्त मेट्रो मेट्रो ओरडून घसा ताणला?
पुण्यात कात्रजपासून वाकडेवाडी खडकी पर्यंत सिंहगड रस्ता, विद्यापीठ रस्ता, टिंबर मार्केट, हडपसर पर्यंत अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या पावसामुळे पुण्यात पूरपरिस्थिती सारखी स्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची मुळ कारणे शोधताना, शहरातील नालेसफाई केवळ कागदोपत्री होत असल्याचे वास्तव दरवर्षी समोर आले आहे.नालेसफाईसाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येतो. तरीही, शहरातील नाले स्वच्छ नसल्यामुळे पावसाच्या पाण्याने नाले तुंबतात व रस्त्यावर पाणी साचते. ही स्थिती शहरातील जनतेसाठी जीवघेणी ठरलेली आहे.यंदाही पावसाने नालेसफाई कशा प्रकारे केली असेल याची पितळ उघडे पडले आहे. नियोजनबद्ध विकासामुळे पुणे शहर अजून काय काय बघणार याची कल्पना न केलेली बरी.
पुढील पाच दिवसात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारी आणि उत्तरेकडील अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच:
• नैऋत्य मोसमी पाऊस मध्यवर्ती अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणचे आणखी काही भाग आणि दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओदिशाचे काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या आणखी काही भागात आज 8 जून 2024 रोजी पुढे सरकला आहे.
• मध्यवर्ती अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, महाराष्ट्र (मुंबईसह) आणि तेलंगणच्या आणखी काही भागात पुढील 2-3 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाला आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.
• वातावरणातील तपांबराच्या तळाच्या आणि मध्यम पातळीवर 16° उत्तरेदरम्यान एक पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळपर्यंत तपांबराच्या तळाच्या पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या प्रभावाखालीः
• पुढील पाच दिवसात कोकण आणि गोव्यात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळ, माहे, लक्षद्वीप मध्ये बऱ्याच भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह(40-50 किमी/तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता, आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि याणम्, रायलसीमा, तेलंगण, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि काराईकलमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.
• कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी 12 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार, 10 ते 12 जून दरम्यान केरळ आणि माहेमध्ये, 8 ते 10 जून दरम्यान दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात; मराठवाडा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल आणि तेलंगणमध्ये 8 ते 10 जून दरम्यान, मध्य महाराष्ट्रात 9 ते 11 जूनदरम्यान, कर्नाटक किनारपट्टीवर 8 ते 9 जून दरम्यान आणि उत्तरेकडील कर्नाटकच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, रात्रीचे उबदार वातावरण आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा
• ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातील भाग या ठिकाणी तुरळक क्षेत्रात 8 ते 12 जूनदरम्यान, ओदिशा, पंजाब,हरयाणा येथे 9 ते 12 जून दरम्यान, जम्मू काश्मीर लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश येथे 10 ते 12 जून दरम्यान उष्णतेची लाट असेल .
• 8 जून रोजी उत्तर प्रदेशात तुरळक भागांमध्ये उष्णतेची लाट असेल आणि या भागातील काही ठिकाणी 9 ते 12 जून दरम्यान उष्णतेची आणि अतितीव्र उष्णतेची लाट असेल.