- मेहुल पटेल(८३धावा), सिद्धेश वीर(७६धावा)संघाच्या विजयाचे शिल्पकार
पुणे, ६जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत पाचव्या दिवशी पहिल्या लढतीत मेहुल पटेल(८३धावा) व सिद्धेश वीर(नाबाद ७६धावा) यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा ७० धावांनी पराभव करत पहिला विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सिद्धेश वीर व विशांत मोरे या सलामी जोडीने ४१ चेंडूत ५१ धावांची सलामी दिली. विशांत मोरे १९ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मेहुल पटेलने सिद्धेश वीरच्या साथीत शतकी भागीदारी करताना संघाच्या डावाला आकार दिला. मेहुलने ३३चेंडूत ८३ धावांची तुफानी खेळी केली. त्यात त्याने ६चौकार व ७ षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. सिद्धेश वीरने ५४चेंडूत ८चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद ७६धावांची संयमी खेळी करत साथ दिली.
सिद्धेश वीरने मेहुल पटेलच्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूत १२२ धावांची भागीदारी करून संघाची स्थिती अधिक भक्कम केली. ही भागीदारी एमपीएलमधील या मौसमातील सर्वोच्च भागीदारी ठरली. विशेष म्हणजे मेहुलने पियुश साळवीच्या १८व्या षटकात २९ धावा चोपल्या. यात ३षटकार व २ चौकारांचा समावेश होता. रायगड रॉयल्स संघाने २० षटकात ४बाद १९९धावांचे आव्हान उभे केले.
१९९ धावांचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पा संघाला निर्धारित षटकात बाद धावाच करता आल्या. सलामीचे फलंदाज पवन शहा(११धावा), शुभम तैस्वाल(६धावा) हे स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर रोहन दामले(२४धावा) व यश क्षीरसागर(२०धावा)यांनी थोडासा प्रतिकार केला. विकी ओस्तवालने दोघांना बाद करून पुणेरी बाप्पा संघाला अडचणीत टाकले. ऋतुराज गायकवाडने २८चेंडूत २चौकार व ३षटकारासह ३६धावांची लढत अपुरी ठरली.रायगड रॉयल्सकडून तनय संघवीने २४धावात ३गडी बाद केले. त्याला निखिल कदम(२-१७), विकी ओस्तवाल(२-२२)ने दोन गडी, सुनील यादव(१-४१)ने एक गडी बाद करून चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक:रायगड रॉयल्स: २०षटकात ४बाद १९९धावा(मेहुल पटेल ८३(३३,६x४,७x६), सिद्धेश वीर नाबाद ७६(५४,८x४,१x६), विशांत मोरे १९, नौशाद शेख १३, रामकृष्ण घोष २-४, यश क्षीरसागर १-१४) वि.४एस पुणेरी बाप्पा: २०षटकात ८बाद (ऋतुराज गायकवाड ३६(२८,२x४,३x६), रोहन दामले २४, यश क्षीरसागर २०, सचिन भोसले नाबाद २०, तनय संघवी ३-२४, निखिल कदम २-१७, विकी ओस्तवाल २-२२, सुनील यादव १-४१); सामनावीर –