Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फडणवीस नव्हे विनोद तावडे भाजपचा CM पदाचा चेहरा:वरिष्ठांच्या कारवाईच्या भीतीमुळे राजीनाम्याची तयारी, सुषमा अंधारेंचा दावा

Date:

मुंबई-

पुढील कोणत्याच निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल, असे म्हणत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नकारात्मक भावना आहे. ही भावना वरिष्ठ पातळीवर कळाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असेल, त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. भाजपच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनाद तावडे यांचे नाव पुढे येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी महाराष्ट्रात असलेली नकारात्मक भावना भाजपच्या वरीष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच वरिष्ठ नेते त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतील. त्यामुळे सूकर एक्झिट म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाच्या नेते सुषमा अंधारे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यासाठी आपण पक्ष श्रेष्ठींकडे मागणी करणार असल्याचे तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळ भारतीय जनता पक्षाचे काम करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

केवळ याच नाही तर यापुढे कोणत्याही विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करायचा असेल तर ते कदाचित विनोद तावडे यांचे नाव पुढे करतील, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या पुढाकारावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हकालपट्टीची तयारी भाजपचे वरीष्ठ नेते करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...