Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा झंझावात, काँग्रेस- ठाकरेंची शिवसेना-शरद पवारांकडे ३० जागा; महायुतीला १७ जागा , १ अपक्ष

Date:

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :पुणे : महाराष्ट्रातील लोकसभेचे मैदान जिंकताना महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत दमदार यश संपादन केले. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंनी ९ तर शरद पवार यांच्या पक्षाने ८ जागांवर विजय मिळविला. भाजपने ९, शिंदेसेनेने ७ तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष विशाल पाटील विजयी झाले.

गेल्यावेळी ४१ जागा जिंकणाऱ्या युतीमध्ये फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी सहभागी झाली पण गेल्यावेळपेक्षा निम्म्याहून चार जागा यावेळी कमीच मिळाल्या. थेटच सांगायचे तर शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यावर मोठी मात केली. भाजपने २८ जागा लढल्या आणि केवळ ९ जिंकल्या. काँग्रेसने १७ जागा लढल्या आणि १३ जिंकत खणखणीत यशाला गवसणी घातली. देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रचंड बहुमताने जिंकली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसला. प्रमुख पराभूत उमेदवारात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर, डॉ. हीना गावित, नवनीत राणा, प्रताप पाटील चिखलीकर, चंद्रकांत खैरे, डाॅ. सुजय विखे पाटील यांचा समावेश आहे. प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, सुनील तटकरे यांचा समावेश आहे. सांगलीत भाजप व उद्धव सेना या दोघांनाही धक्का देत अपक्ष विशाल पाटील जिंकले.

क्र. मतदार संघ- विजयी उमेदवाराचे नाव (पक्ष)
१. नंदुरबार – गोवाल पाडवी (काॅग्रेस)
२. धुळे – शोभा बच्छाव (काॅंग्रेस)
३. जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
४. रावेर – रक्षा खडसे (भाजप)
५. बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना)
६. ⁠अकोला – अनुप धोत्रे (भाजपा)
७. ⁠अमरावती – बळवंत वानखेडे (काॅंग्रेस)
८. वर्धा – अमर काळे (शरद पवार)
९. रामटेक – शामकुमार बर्वे (काॅंग्रेस)
१०. नागपूर – नितीन गडकरी (भाजप)
११. ⁠भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोले (काॅग्रेस)
१२. गडचिरोली-चिमूर – नामदेव किरसान (काॅंग्रेस)
१३. ⁠चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर (काॅंग्रेस)
१४. ⁠यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (उबाठा)
१५. ⁠हिंगोली – नागेश पाटील (उबाठा)
१६. ⁠नांदेड – वसंत चव्हाण (काॅंग्रेस)
१७. ⁠परभणी – संजय जाधव (उबाठा)
१८. ⁠जालना – कल्याण काळे (काॅंग्रेस)
१९. ⁠औरंगाबाद – संदीपान भुमरे (शिवसेना)
२०. ⁠दिंडोरी – भास्करराव भगरे (शरद पवार)
२१. ⁠नाशिक – राजाभाऊ वाझे (शरद पवार)
२२. ⁠पालघर – हेमंत सावरा (भाजप)
२३. ⁠भिवंडी – बाळ्या मामा (शरद पवार)
२४. ⁠कल्याण – श्रीकांत शिंदे (शिवसेना)
२५. ⁠ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना)
२६. ⁠मुंबई उत्तर – पियुष गोयल (भाजप)
२७. ⁠मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर (शिवसेना)
२८. ⁠मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील (उबाठा)
२९. ⁠मुंबई उत्तर मध्य – वर्षा गायकवाड (काॅंग्रेस)
३०. ⁠मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई (उबाठा)
३१. ⁠मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (उबाठा)
३२. ⁠रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
३३. ⁠मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना)
३४. ⁠पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
३५. ⁠बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार)
३६. ⁠शिरुर – अमोल कोल्हे (शरद पवार)
३७. ⁠अहमदनगर – निलेश लंके (शरद पवार)
३८. ⁠शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे (उबाठा)
३९. ⁠बीड – बजरंग सोनवणे राष्ट्रवादी (एसपी)
४०. ⁠उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (उबाठा)
४१. ⁠लातूर – शिवाजी काळगे (काॅंग्रेस)
४२. ⁠सोलापूर – प्रणिती शिंदे (काॅंग्रेस)
४३. ⁠माढा – धैर्यशील मोहिते (शरद पवार)
४४. ⁠सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
४५. ⁠सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
४६. ⁠रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे (भाजप)
४७. ⁠कोल्हापूर – शाहू महाराज (काॅग्रेस)
४८. ⁠हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)

संख्याबळ
भाजप – ९
शिवसेना – ०७
राष्ट्रवादी – ०१
उबाठा – ०९
शरद पवार गट – ०८
काॅंग्रेस – १३
अपक्ष – ०१
एकूण – ४८

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

9370960061 पुण्यातील पर्यटकांसाठी प्रशासनाचा क्रमांक:264 पुणेकर पुलगावमध्ये अडकले; सर्वांना सुखरूप आणणार -मोहोळ

पुणे-जम्मू-काश्मिरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. आज संध्याकाळी...

पुण्यातील असंख्य पर्यटक काश्मीर मध्ये अडकले, महाराष्ट्र सरकारकडे परतण्यासाठी आवाहन,पहा नावांची यादी

पुणे- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीरच्या सहलीला गेलेले सांख्य पर्यटक...

हाफिज सईदचा सहकारी सैफुल्ला खालिद पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टन्स फ्रंट’...

मोदींबाबत अपशब्द वापरत गोळीबार

दहशतवाद्यांच्या भीतीने आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी माझे ५४ वर्षीय...