NDA ला 291 तर I.N.D.I.A ला 234 जागा
नवी दिल्ली-18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. 542 जागांपैकी NDA ला 291 तर I.N.D.I.A ला 234 जागा मिळत आहेत. मात्र, भाजपला बहुमताचा 272 चा आकडा पार करता आला नसला तरी एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपला 2014 मध्ये 278 तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या होत्या.दरम्यान, सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. एनडीएने बुधवारी सकाळी 11.30 वाजता आपल्या घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधानांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांना भेटीसाठी बोलावले आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, रात्री 10 वाजेपर्यंत भाजपला 240, काँग्रेसला 99, सपाला 37, टीएमसीला 29, द्रमुकला 22, टीडीपीला 16, जेडीयूला 12, शिवसेना यूटीबीला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 7, आरजेडीला 4, लोक जनशक्ती पक्ष रामविलास 5 आणि शिवसेना शिंदे 7 जागा जागा मिळताना दिसत आहेत.