नवी दिल्ली- लोकसभेच्या 543 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान काँग्रेस राहुल गांधी यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. बहीण प्रियंकासोबत हसत-हसत ते पक्ष कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश हेही होते.
राहुल यांनी 7 मिनिटे मीडियाशी संवाद साधला. लोकसभेच्या निकाल आणि कलाबाबत ते म्हणाले – देशाला मोदी-शहा नको आहेत. हा लढा संविधान वाचवण्यासाठी होता. खरं सांगू, आमचं अकाऊंट जप्त झालं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं. दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. तेव्हा संविधान वाचवण्यासाठी जनताच लढेल असे मनात होते.
भारतातील जनतेने संविधान आणि लोकशाही वाचवली आहे. देशातील वंचित आणि गरीब जनता त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी भारताच्या पाठीशी उभी आहे. सर्व आघाडीचे सहकारी आणि काँग्रेसच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या निकालाबद्दल राहुल यांनी बहीण प्रियांका यांचेही कौतुक केले. प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या- मी खूप आनंदी आहे. मी यूपीच्या लोकांना सांगू इच्छितो की, त्यांनी खूप शहाणपण दाखवले आहे. मला यूपीचा सर्वाधिक अभिमान आहे.