पुणे, दि.३: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होत असलेल्या कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये आयोजित मतमोजणी प्रशिक्षणात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
सर्व मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणताही ताण न घेता आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कामकाज करावे. मतमोजणी प्रक्रिया निरंतर गतीने, सहजतेने मात्र संपूर्ण जबाबदारीने पार पाडावी, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. दिवसे यांनी मतमोजणीच्या तांत्रिक बाबींबाबतही मार्गदर्शन केले.
००००