पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘यमन रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार,दि.२५ मे २०२४ रोजी करण्यात आले होते.’बिल्वकल्प’ प्रस्तुत या कार्यक्रमात यमन रागावर आधारित मराठी हिंदी गीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘यमन रंग ‘ कार्यक्रमात पारंपारिक बंदिशी ,सरगम गीत ,तराणे , मराठी , हिंदी आणि नाटयगीते सादर करण्यात आली. बिल्वा द्रविड ,पुष्कर गाडगीळ यांनी गायन सादर केले. डॉ.नरेंद्र चिपळूणकर(हार्मोनियम),रोहित जाधव(तबला ) यांनी साथसंगत केली तर सौ. सुधा राजगुरू यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
हा कार्यक्रम शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला .हा कार्यक्रम विनामूल्य होता .भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०९ वा कार्यक्रम होता..भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक करून कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. बिल्वा द्रविड- यांच्या स्वरात- राग- यमनचे रागस्वरुप , बंदिशी- एरी आली पियाबिन – ही आग्रा घराण्याचे उ. नत्थन खाॅसाहेबांनी यांनी रचलेली बंदीश सादर करण्यात आली. लंगर तुरक जिन छुओरी या बंदिशीमधून जुना यमन राग कसा होता याचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर यमन रागातील तराणा – ताल- त्रिताल – तानो दिरदिर तयियन रे सादर झाले.
पुष्कर गाडगीळ यांनी गुरू पं. विजयजी बक्षी यांनी रचलेली बंदीश सादर केली.
प्रथम तुला वंदीतो, मागे उभा मंगेश, पांडुरंग कांती, तोच चंद्रमा, ये जवळी घे जवळी, आकाशी झेप घे रे, शुक्रतारा मंदवारा ,चंद्र आहे साक्षीला ‘ ही यमन रागातील गीते सादर करण्यात आली. मराठी मेडली, हिंदी मेडली सादर झाली. , देवा घरचे ज्ञात कोणाला ‘,कठीण कठीण कठीण किती ही यमन रागातील नाटय पदे सादर झाली.
यमन रागातील ‘ इस मोडसे, ये मोह मोह के धागे, जीया ले गयो , ये लाल इश्क, ही हिंदी गीते सादर करण्यात आली. या सर्व गीतांना चांगला प्रतिसाद मिळाला.