देवेंद्र फडणवीसच काय तर अमृता फडणवीस यांनीही आरोपींना कडक शिक्षेसाठी आवाज उठविला …
पुणे – कल्याणीनगर Drunk and drive अपघात प्रकरणात शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे गप्प का? शरद पवार गटाकडून या प्रकरणात कोणती प्रतिक्रिया का येत नाहीये? अगरवाल आणि पवार कुटुंब यांचे काय संबंध आहेत काय? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची माहिती मिळेते आहे. म्हणजे अग्रवाल याला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का? त्यामुळे एरव्ही सर्वप्रकरणी आवाज उठविणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्त व्हावे, असं म्हणत नितेश राणे यांनी खासदार सुप्रिया सुळेंना सुनावलं आहे. आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा चांगलाच समाचार घेतला.