पुणे-राम सातपुते यांनी पुण्यातील कल्याणी नगर अपघातानंतर शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांना लक्ष करत
. @AnilDeshmukhNCP याला गृहखाते सांभाळण म्हणतात . तुम्ही जर गृहमंत्री असतात तर पहिल्यांदा तुमच्या लाडक्या वाझे ला वसुलीला पाठवलं असतं या पब मालकांकडे. Well done @Dev_Fadnavis जी .
अशा शब्दात फडणवीस यांचे कौतुक आणि माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांवर वार केल्यावर पुण्यातील शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यात उडी घेतली आहे. पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस आणि महापौर तसेच 100 नगरसेवक झोपले होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
https://x.com/JagtapSpeaks/status/1793260786976161975
रामभाऊ बीडवाले… हे अनधिकृत पब सुरू असताना तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस, महापौर बंगल्यातील महापौर अन् १००+ नगरसेवक झोपले होते का ? की दोन निष्पाप बळी जाण्याची वाट बघत होते ? अनधिकृत पब बंद करणं हे काय पबजी खेळण्यासारखं आहे का ?
अशा शब्दात राम सातपुते यांचा समाचार घेतला आहे.