पुणे- पुण्यात भाजपच्या लोकांनी पर्वती विधानसभा मतदार संघात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन केला आणि याबाबत पोलीस ठाण्यातूनच Fblive केल्यावर त्याला भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या २ नगरसेवकांनीही पोलीस ठाण्यात जाऊन fb live वरून प्रत्युत्तर दिल्यानंतर आता वातावरण पेटले आहे. स्थानिक महायुतीचे महेश वाबळे , सुभाष जगताप यांच्यात आणि महाविकास आघाडीचे नितीन कदम अनिल सातपुते , सतीश पवार यांच्यातील वादंग लोकसभेचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी येथे धाव घेतली आणि . पैसे वाटपा बाबत भाजपच्या कार्यकर्त्या वर गुन्हे दाखल करा ,त्यासाठी सीसी टीव्ही ची मदत घ्या अशी कार्यकर्त्यांची मागणी लावून धरत येथे ठिय्या मांडला . आणि त्यानंतर येथे काही वेळाने भाजपचे कार्यकर्तेही दाखल झाल्यावर दोन्ही बाजूंनी मोठी राजकीय घोषणाबाजी झाली. आणि गोंधळ माजला .
त्यापूर्वी सहकारनगर भागात भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैशांचे वाटप करीत आहेत. याची तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले असून सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिया मांडला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, अशी भूमिका धंगेकरांनी घेतली.