पुणे -महाविकास आघाडीचे नितीन कदम,अनिल सातपुते,सतीश पवार यांनी सीसी टीव्ही तपासा,पैसे वाटप चालू आहे अशी तक्रार करत FIR दाखल करा अशी मागणी करत सहकारनगर पोलिस ठाण्यात ठिय्या केल्यावर आता आमदार आणि लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह या पोलीस ठाण्यात ठिय्या केला आहे. तक्रार दाखल करून का घेत नाही / असा सवाल यावेळी करण्यात येत होता.
महायुतीचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचाराचे काम या परिसरात सुभाष जगताप, महेश वाबळे यांनी केले आहे तर रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे काम नितीन कदम आणि आबा बागुल यांनी केलेले आहे. काल प्रचाराची मुदत संपल्यावर आज यांच्यातील नितीन कदम आणि सातपुते , पवार यांनी पोलिसात पैसे वाटपाची ताकार करण्याचा प्रयत्न केला तर महेश वाबळे यांनी सद्य वाटपाची तक्रार करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुभाष जगताप यांनी मोहोळ यांच्या संदर्भात कदम यांनी १० प्रश्ने उपस्थित करत सुरु ठेवलेल्या प्रचाराला प्रत्युत्तर FB Live करत दिले. त्यानंतर येथे कदम , सातपुते , पवार यांच्या ठिय्या आंदोलनात येथे स्वतः रवींद्र धंगेकर येऊन बसले.