पुणे- सहकारनगर परिसरातील भाजपा महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात कुरबुरी झाल्याचे वृत्त आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात सुभाष जगताप , महेश वाबळे आणि नितीन कदम यांनी संपर्क साधल्याचे दिसून आले आहे. वाबळे आणि जगताप यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस ठाण्याच्या आवारातून FB live करत नितीन कदम यांनी Whatsapp वरून उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि केलेल्या आरोपांना उत्तरे दिली .
नितीन कदम यांनी मोहोळ यांनी पर्वती मतदार संघासाठी केलेल्या मेहरबान्या या शीर्षकाने १०प्रश्न उपस्थित केले होते .त्यानंतर आज कदम ,अनिल सातपुते , सतीश पवार आदी कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन पैसे वाटपाची तक्रार करत FIR दाखल करण्याची मागणी केली आणि सीसी टीव्ही तपासून घ्या अशी मागणी केली.