आव्हाडांनी संस्काराची भाषा करू नये-हर बात को नाना नही कहना कभी आना भी कहना‘ म्हणत पटोलेंचीही उडवली खिल्ली
मुंबई- कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असं विरोधक वारंवार म्हणत होते. मात्र आम्ही या गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही. तर त्या सर्वांवर कारवाई केली जाईल. मात्र ज्यांचे गृहमंत्री हेच जेलमध्ये गेले आहेत. त्यांनी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काहीही शिकवू नये
एकनाथ शिंदे म्हणाले- कायदा सुव्यवस्थेचं समर्थन करणार नाही. मात्र या घटनेचं राजकारण करणं यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. यामध्ये तरूणांचेही खून झाले आहेत. यात हनुमान चालीसा म्हटल्यावर देशद्रोहाचं उदाहरण, खासदार आमदारांना, अर्नब गोस्वामी, कंगना रनौत, याकुबच्या कबरीचं उदारीकरण केलं. यांना जीवा महाल यांचं स्मारक आठवलं नाही. मविआचे सरकार असतांना त्यांनी हुकुमशाही पद्धतीने खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे तुम्हाला यावर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही कधीही कुणावर अन्याय केला नसल्याचेही शिंदे म्हणाले.
शिंदे पुढे म्हणाले की, लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये दाखल केलं. जो कायदा मोडणार त्यालाही आम्ही सोडणार नाही. तसेच चुकीची कारवाईदेखील आम्ही कधी करणार नाही. पुणे पोलिसांनी ड्रग्ज पकडले त्यांच्यावर आम्ही कारवाई केली. ज्यांचे गृहमंत्रीच जेलमध्ये जातात. त्यांनी आम्हाला कायदा सुव्यवस्थेबद्दल काही शिकवू नये.
जितेंद्र आव्हाड तुमचा काय अधिकार आहे. तुम्ही या कायदा आणि सुव्यवस्थेवर काहीही बोलू नये. ज्यांनी एका सर्वसामान्य माणसाला काळ निळं होईपर्यंत मारलं आणि आता त्यांनीच आम्हाला संस्कार काय हे शिकवणे, हेच तुमचे संस्कार आहेत का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांवरही हल्ला चढवला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतांना शिंदे म्हणाले की, आधीच्या सरकारने राज्यातील ,सर्व प्रकल्प बंद पाडले आणि आम्ही आता सर्व सुधारीत प्रकल्पांना मंजूरी दिली. हर बात को नाना नही कहना कभी आना भी कहना असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंची खिल्ली उडवली.