मुंबई,- बँक ऑफ कृषी उपकरणे आणि कृषी वाहन या दोन योजनांवर आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स लाँच केल्या असून त्या ३१ मार्च २०२४ पर्यंत खुल्या राहातील. शेतकरी आणि शेती उद्योजकांना जाणवणाऱ्या महत्त्वाच्या समस्येवर – आवश्यक वित्तीय सहाय्य मिळवण्यावर तोडगा काढण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
बँकेच्या कृषी वाहन आणि कृषी उपकरण कर्ज योजनेअंतर्गत शेतीशी संबंधित महत्त्वाच्या घटकांसाठी टर्म कर्ज सुविधा पुरवली जाते. त्यामध्ये शेती उपकरणे, वाहतुकीची साधने यांचा समावेश होतो. कृषी वाहन कर्ज योजनेचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण त्यामध्ये वाहनाची ९० टक्के एक्स शोरूम किंमत दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, तर शेती उद्योजकांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची गरज नसते. शेती उपकरणांसाठी खर्चाच्या ८५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
या योजनांचे वेगळेपण म्हणजे, त्या शेतकरी व शेती उद्योजकांना भरीव लाभ देतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या छुप्या खर्चाचा समावेश नसून त्यासाठी लागणारी कागदपत्रांची प्रक्रियाही थेट आहे. हे कर्ज प्रकार ग्राहकाच्या सोयीनुसार, सोपी अर्ज प्रक्रिया असलेले व जलद वितरण करणारे आहेत.
बँक ऑफ इंडियाची ही बांधिलकी सहज व प्रभावी वित्त पर्याय उपलब्ध करून देण्याप्रती बँकेचे प्रयत्न दर्शवणारी आहे. बँकेने शेतकरी व शेती उद्योजकांना सक्षम करण्याचे, आधुनिक शेतीमधील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी बळ देण्याचे ध्येय ठेवले आहे. त्याशिवाय हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शेती उत्पन्न आणि उत्पादनक्षमता वाढवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. ही केवळ वित्त योजना नाही, तर अधिक समृद्ध शेती भविष्याच्या उचललेले लक्षणीय पाऊल आहे.