पुणे-येथील मुंढव्यातील लोणकर पेट्रोल पंपावर दरोडा टाकायला निघालेल्या चौघांना मुंढवा पोलिसांनी पडले आहे. विशेष म्हणजे चौघेही १९/ २० वर्षाची मुले आहेत.
१. हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी, वय-१९ २. कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे, वय-१९, ३. तेजस ऊर्फ सन्नी अश्विन पिल्ले, वय-२०, सर्व रा. केशवनगर, पुणे ४. शशांक श्रीकांत नागवेकर, वय-२० वर्षे, रा. सुशिल सिध्दी सोसायटी, हनुमाननगर, केशवनगर, मुंढवा, पुणेअशी या दरोडेखोरांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’तीन इसम दिनांक ०८/०२/२०२४ रोजी रात्रौ ००/४० वा. झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाचे मागील बाजुस कच्च्या रस्त्यालगत अंधारात मुंढवा, पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती .
या चौघांनी संगनमत करून, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुणे पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्रात शस्त्रे, सोटे, तलवारी, शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगण्यास बंदी आदेश असताना, त्यांनी सदर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करून, आपले कब्जात बेकायदेशीररित्या व अनधिकृतपणे लोखंडी रॉड, लोखंडी पोकळ पाईप, दोन लोखंडी धारधार हत्यार इत्यादी घातक शस्त्रे तसेच मिरची पुड व नायलॉन रस्सी असा एकुण ६००/- रू किचा ऐवज बेकायदेशीररित्या आपले जवळ बाळगुन, हत्याराची व साथीदारांची जमवाजमव करून, दरोडा टकाण्याची पुर्ण तयारी करून, सदर भागात दहशत निर्माण करून, झेड कॉर्नर येथिल लोणकर पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी दरोडा टाकुन लुटण्याचे तयारीत असताना मिळुन आले. सहा. पोलीस निरीक्षक जोरे ९४०३५४७५०१ हे अधिक तपास करत आहेत.