एमआयटीत ‘डिजिटल डिझाइन’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
पुणे, दि. ९ फेब्रुवारी: ” भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे. मानवाच्या शांतीसाठी आधुनिक युगात कॉन्सियसनेस मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करता येईल का हे पाहणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे संस्कृत भाषेचा वापर करून नवे तंत्रज्ञान कसे विकसीत करता येईल यावर अधिक भर दयावा.” असे विचार डीईएस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ पीस स्टडीज आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात दोन दिवसीय ‘डिजिटल डिझाइन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो येथील संशोधक प्रा. असिल्ड कोलास या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ.प्रियंकर उपाध्याय व प्रा. डॉ. अंजु उपाध्याय हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ.मिलिंद पात्रे व प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ. भागवत बिराडी हे उपस्थित होते. या परिषदेला देश विदेशातील जवळपास शेकडो लोक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रसंगी पीस स्टडीजच्या ब्रोशरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याच प्रमाणे डब्ल्यूपीयूमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्याने सुरू करण्यात येणार्या एम.ए पीस अॅण्ड कॉन्फीक्ट मॅनेजमेंट हा पाठ्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
डॉ. प्रसाद खांडेकर म्हणाले,”भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात याची परीभाषा समजून घेणे गरजचे आहे. मानव सतत शांतीच्या शोधात असतो. परंतू डिजिटल युगात त्या पासून दुरावला आहे. अशा वेळेस त्याचाच उपयोग करून शांतीच्या मार्गावर चालावे.”
प्रा. असिल्ड कोलास म्हणाल्या,” आधुनिक युगात आंतरिक व बाह्य शांतीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.”
प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” कुटुंब, समाज, राष्ट्र व एकूणच संपूर्ण मानवजातीसाठी शांती अत्यंत महत्वाची आहे. माइंड, मॅटर, स्पीरीट अॅण्ड कॉन्सीयसनेस याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समजावून घेऊन त्याचा शांतीसाठी उपयोग करावा. तसेच संगणकिय युगात अंर्तमनाचा शोध घ्यावा.”
प्रा.डॉ.प्रियंकर उपाध्याय यांनी प्रस्तावनेत सांगितले की, प्रत्येकाच्या जीवनात शांती महत्वाची आहे. परंतू मानवाच्या अंर्तमनावर डिजिटल व आर्टीफिशियलचा प्रभाव अधिक पडत असल्याने तो शांतीपासून दुरावला जात आहे.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. सचिन गाडेकर यांनी केले. डॉ. भागवत बिराडी यांनी आभार मानले.