पुणे, 08 फेब्रुवारी 2024: अजून एक लक्षणीय वैद्यकीय यश संपादन करत, मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्समधील ऑब्स्टरिक्स विभागाच्या प्रमुख आणि संचालिका डॉ मिनी साळुंखे, गायनॅकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टट्रीशियन डॉ गौरी जगदाळे आणि डॉ सुनील यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या तज्ञ टीमने १३ वर्षे वयाची, शाळेत जाणारी मुलगी प्रिया (नाव बदलण्यात आले आहे) हिच्या अंडाशयाला झालेल्या दुर्मिळ विकारावर यशस्वीपणे उपचार केले आहेत. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील तज्ञ डॉक्टरांनी प्रियावर लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी करून एक मोठे व गुंतागुंतीचे ओव्हरीयन सिस्ट काढले. अद्याप मासिकपाळी देखील सुरु न झालेल्या मुलींमध्ये अशाप्रकारचे सिस्ट असणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे.
२०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात प्रियाला पोटदुखी सुरु झाली जी महिनाभर होत राहिली. प्राथमिक सोनोग्राफी आणि एमआरआयमध्ये बऱ्यापैकी मोठे ओव्हरीयन सिस्ट (आकार १७*१६*१२ सेमी) असल्याचे आढळून आले, अंडाशय स्वतंत्रपणे नीट दिसत नव्हते. विशेष म्हणजे, सीए १२५ हे लक्षण (अंडाशयाचा कर्करोग असलेल्या लोकांमध्ये आढळतो) वगळता इतर सर्व ट्यूमर मार्कर सामान्य श्रेणीत होते. यामुळे डॉ मिनी साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील टीमने शरीरावर फार जास्त घाव न होणाऱ्या लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
डॉ मिनी साळुंखे यांनी सांगितले, “सर्जरीनंतर प्रियाच्या तब्येतीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. प्रक्रिया संपल्यानंतर केवळ सहा तासांत ती चालू शकली. हिस्टोपॅथोलॉजिकल परीक्षणात आढळून आले की, हे सिस्ट एन्डोमेट्रिऑटिक होते. जिची अद्याप मासिक पाळी सुरु झालेली नाही अशा मुलीमध्ये असे सिस्ट निर्माण होणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये या आजाराचे लवकरात लवकर करण्यात आलेले निदान आणि पेडियाट्रिक केसेसवर करण्यात येणारे प्रगत उपचार यांचे महत्त्व या अनोख्या केसमुळे अधोरेखित झाले आहे.”
सर्जिकल टीममधील डॉ गौरी जगदाळे म्हणाल्या, “प्रियाच्या वयाच्या रुग्णांमध्ये अशी व्याधी असणे हे खूपच दुर्मिळ आहे. आम्ही यशस्वीपणे केलेल्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळे प्रियाला वेदनांपासून मुक्ती तर मिळालीच पण त्याबरोबरच, पेडियाट्रिक गायनॅकॉलॉजी क्षेत्रासाठी शिकण्याची व संशोधनाची एक अनोखी संधी देखील निर्माण झाली.” लवकरात लवकर करण्यात आलेले निदान व योग्य उपचार महत्त्वाचे ठरले हे डॉ गौरी यांनी देखील ठळकपणे सांगितले. खासकरून दुर्मिळ केसेसमध्ये या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात असेही त्या म्हणाल्या.
डॉ सुनील म्हणाले, “या केसमध्ये आमच्या मेडिकल टीमचे सामूहिक प्रयत्न आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह तंत्राचा प्रभाव दिसून आला. प्रियाच्या तब्येतीमध्ये वेगाने झालेल्या सुधारणेमुळे पेडियाट्रिक केसेसमध्ये लॅप्रोस्कोपिक प्रक्रिया किती लाभदायक ठरते हे अधोरेखित झाले, प्रगत आरोग्य देखभालीप्रती हॉस्पिटलची बांधिलकी देखील दिसून आली.”
सह्याद्रि हॉस्पिटल्सने या प्रक्रियेमध्ये संपादन केलेले यश प्रगत वैद्यकीय देखभालीप्रती तसेच खासकरून पेडियाट्रिक केसेसमध्ये नाविन्यपूर्ण, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जिकल टेक्निक्सचा वापर करण्याप्रती रुग्णालयाची वचनबद्धता दर्शवते. प्रियाच्या तब्येतीमध्ये झालेल्या सुधारणेमध्ये हॉस्पिटलने मोलाची भूमिका बजावली असून, प्रत्येक रुग्णाच्या आवश्यकतेनुसार विशेष उपचार नियोजनावर लक्ष केंद्रित करून उच्च दर्जाची आरोग्य देखभाल पुरवण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल बांधील आहे.
एन्डोमेट्रिऑटिक सिस्ट – ही छोटी, द्रवाने भरलेली सॅक असते जी एन्डोमेट्रिओसिसमुळे अंडाशयावर निर्माण होते. एन्डोमेट्रिओसिसमध्ये युटेरियन लायनिंग टिश्यू गर्भाशयाच्या बाहेर, अंडाशय, फॅलोपियन ट्यूब्सवर आणि/किंवा पेल्विक पेरीटोनियमवर वाढतो. हे ओव्हरीयन सिस्ट हार्मोनल असंतुलनामुळे होते. पोटदुखी, मासिक पाळीमध्ये भरपूर स्त्राव होणे आणि वंध्यत्व ही लक्षणे यामुळे उत्पन्न होतात.