पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची यांची बदली झाली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे बदली करण्यात आले असून सौरभ राव हे आता सहकार आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत त्याचबरोबर यांना सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. सौरभ राव यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुण्याचे नवीन विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे नांदेडचे असलेले डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे 2008 च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी साखर आयुक्त, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक संचालक म्हणून काम केले आहे. 2008 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिले. यांच्यासह अन्य काही ठिकाणच्या आधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
या अधिकाऱ्यांची झाली बदली
1. IAS सौरभ राव – (2003) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
2. IAS अनिल एम. कवडे – (2003) आयुक्त, सहकार आणि निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. IAS अनिल पाटील – (2012) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4. IAS डी.के. खिल्लारी – (2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांची संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. IAS राहुल गुप्ता – (2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव, सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, छत्रपती संभाजी नगर
6. IAS मुरुगनंथम एम – (2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी, चंद्रपूर उपविभाग, चंद्रपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
7. IAS यशनी नागराजन – (2020) प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.