उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न
सातारा:
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज १ मे महाराष्ट्र दिनी सातारा येथे लहान मुलांच्या आरोग्य सेवेचा मोठा यज्ञ पार पडला. सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत २-डी इको तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरा’ला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि ठाणे येथील नामांकित ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध आरोग्य उपक्रम राबवले जात असून, साताऱ्यातील हे शिबिर त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे.
या शिबिरात साताऱ्यातील आणि ग्रामीण भागातील शेकडो मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून २-डी इको तपासणी करण्यात आली. ज्या बालकांना हृदयाला छिद्र असणे किंवा अन्य गंभीर हृदयविकार असल्याचे निष्पन्न होईल, त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
“हृदयाला छिद्र असण्यासारख्या शस्त्रक्रिया अत्यंत महागड्या असतात. सामान्य कुटुंबांना हा खर्च पेलवणारा नसतो. अशा वेळी कोणतंही बाळ उपचारांशिवाय राहू नये, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. तपासणीत शस्त्रक्रियेची गरज भासणाऱ्या प्रत्येक रुग्णाची संपूर्ण जबाबदारी शिंदे साहेब घेतील.”
— मंगेश चिवटे (प्रमुख, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष)

