‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Date:

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा शुक्रवारी (१ मे) सकाळी ७:०० वाजता पार पडला.

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह डॉ. अनुश्री चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षता विभागाचे पोलीस निरीक्षक पवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नितीन भोंगळे यांच्या पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘पीएमआरडीए’मधील महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात आकर्षक रांगोळी रेखाटली होती. या सोहळ्याला प्रशासकीय विभागाच्या सहआयुक्त रुपाली आवले-डंबे, जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी, अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर, अधीक्षक भूमी अभिलेख आशा जाधव आणि अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यगीताने या सोहळ्याची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड-अलिबाग,दि.०१:-...