डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

Date:

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांसह नकाशा प्रकाशित करताना अत्यानंद – सौ. मंजुश्री खर्डेकर.

पुणे-डॉ. सुरेश गरसोळे यांचे भूगोल विषयातील कार्य अद्वितीय असून त्यांनी पुढील 1 मे 2027 पर्यंत नकाशांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी व परदेशा प्रमाणे बोलणारे नकाशे प्रकाशित करावेत असे मत प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. एरंडवण्यातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महाराष्ट्राचा नवीन नकाशा प्रकाशित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी ह्या नकाशाचे निर्माते ज्येष्ठ भूगोल तज्ञ् डॉ. सुरेश गरसोळे, वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, मुक्ता गरसोळे कुलकर्णी, एड.अमृत गरसोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ दिनी राज्याचा नवीन नकाशा प्रकाशित होत आहे आणि तो देखील आपल्या अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या नावांनी याचा अत्यानंद होत आहे अश्या भावना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांमध्येचं नव्हे तर सर्वांनाच भूगोलाची गोडी लागावी यासाठी डॉ. गरसोळे अथक परिश्रम घेत असून त्यांच्या कार्याची शासन स्तरावर दखल घेतली जावी असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
अनेक दशक नवनवीन प्रकारचे नकाशे साकरण्याची संधी मिळाली मात्र आज नवीन जिल्ह्यासह राज्याचा नकाशा तयार करत असताना श्री राम मंदिर, राज्यातील विविध किल्ले असलेला नकाशा देखील साकारला असल्याचे डॉ. गरसोळे म्हणाले. विद्यार्थ्यांना नकाशा वाचणे सुलभ व्हावे यासाठी माझे सतत प्रयोग सुरू असतात असेही डॉ. गरसोळे म्हणाले.
यावेळी डॉ. मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांनी
“बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥”
हे महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. तसेच त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र भूगोल समिती ही समाजसेवेच्या भावनेने सातत्याने कार्य करते असे सांगितले.श्री. अनिल खाडिलकर यांनी शंखनाद केला तर ऍड.अमृत गरसोळे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी उपस्थितांना नवीन नकाशाचे वाटप करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार

मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड-अलिबाग,दि.०१:-...