विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी

Date:

‘जय मल्हार’ भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ; श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : मणी मल्लाचा वध करण्यासाठी शिवाने घेतलेला खंडोबाचा अवतार… तळी भरणे…जागरण गोंधळ…खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह सोहळा… मल्हारी मार्तंडाचे तेजस्वरूप…अशा भगवान महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र विविधांगी रांगोळ्या मधून साकारत जेजुरीच जणू पुण्यात अवतरली आहे.

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवावर आधारित ‘जय मल्हार’ या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे  करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातील द्वादश मार्तंड खंडोबा लिंग तसेच जेजुरी खंडोबा मंदिर येथील खंडोबा देवाच्या मानाच्या पगडीचे दर्शन देखील यानिमित्ताने पुणेकरांना मिळत आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे अध्यक्ष ऍड. विश्वास पानसे व विश्वस्त मंडळ, ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे, अभिनेते देवदत्त नागे, कल्पेश गोसावी, सुप्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजक प्रा. अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अजित पवार, दिनेश मंची उपस्थित होते. प्रदर्शनादरम्यान बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रांगणात खंडेरायाच्या पालखीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनात ‘श्री खंडोबा चरित्र’ ३० वेगवेगळ्या रांगोळ्यांमधून साकारण्यात आले आहे. प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी साधारण ४० ते ४८ तासांचा कालावधी लागला असून, एकूण सुमारे ५०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. हे प्रदर्शन ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रा.अक्षय शहापूरकर म्हणाले, विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्यांचा समावेश प्रदर्शनात आहे. यात थ्रीडी रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी, हलती रांगोळी, टू-इन-वन रांगोळी आणि प्रतिबिंब रांगोळी यांचा समावेश असून, पाहणाऱ्यांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर...

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी...

महाराष्ट्रदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला विचार अभियान

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’ पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने...

समाज माध्यमे दूर सारून स्वतःला ओळखा-अभिनेते संजय मिश्रा

एमआयटी डब्ल्यूपीयूत दादासाहेब फाळके स्टुडिओचे उद्घाटन राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाची...