हडपसरमध्ये लहान मुलांसाठी क्रीडा नर्सरी प्रकल्प- ११.६१ कोटीच्या प्रस्तावाला मान्यता

Date:

पुणे : हडपसर येथील मगरपट्टा रस्त्यालगत आरक्षित क्रीडांगणाच्या जागेवर क्रीडा नर्सरी प्रकल्प उभारण्यासाठी पुणे महापालिकेकडून सुमारे ११.६१ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी आगामी अंदाजपत्रकांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे पेठ हडपसर येथील स. नं. १३६/६ व १३७/४ या जागेवर क्रीडांगण आरक्षित असून, सुमारे १० हजार ४४१ चौ.मी. क्षेत्रफळावर हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. क्रीडा विभागाच्या मागणीनुसार महापालिकेच्या पॅनलवरील आर्किटेक्टकडून नकाशा तयार करण्यात आला असून त्यानुसार स्थापत्य व विद्युत विषयक कामे हाती घेतली जाणार आहेत.

या क्रीडा नर्सरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे, मैदानाशी नाते जोडणे आणि विविध क्रीडा प्रकारांची ओळख करून देणे हा आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये मॉडिफाईड फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, २०० मीटर धावपट्टी, टेबल टेनिस, रोलर स्केटिंग, बॅडमिंटन, लॉन टेनिस, ओपन जिम आदी सुविधांचा समावेश असणार आहे.

भवन रचना विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अंदाजित पूर्वगणनपत्रकानुसार या प्रकल्पासाठी एकूण ११.६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून सन २०२६-२७ मध्ये ४ कोटी, २०२७-२८ मध्ये ४ कोटी आणि २०२८-२९ मध्ये ३.६१ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातून क्रीडा नर्सरी सुविधांसाठी १ कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पाचा एकूण खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ७२ (ब) नुसार पुढील वर्षांच्या अंदाजपत्रकांमध्ये आवश्यक निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची मान्यता मिळाली असून, स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. शहरात लहान वयोगटातील मुलांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विविधांगी रंगावलीतून पुण्यात अवतरली खंडेरायाची जेजुरी

'जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारले खंडोबा चरित्र ;...

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

पुणे, दि. ३० : महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी...

महाराष्ट्रदिनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश व रोहित वेमुला विचार अभियान

प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’ पुणे: महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने...