बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

Date:

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस या नव्या रेल्वे सेवेचे उद्घाटन केले.या ऐतिहासिक प्रसंगी, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हडपसर रेल्वे स्थानकावर ३० एप्रिल २०२६ रोजी रात्री ०० वाजून २५ मिनिटांनी आलेल्या गाडीचे स्वागत केले.
मध्य रेल्वे, पुणे विभागाच्या वतीने विभागीय रेल्वे व्यवस्थापक एच. कुमार वर्मा (IRSS) यांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमास नगरसेवक सुनील पांडे , नगरसेवक रविंद्र साळेगावकर,मारुती तुपे उपस्थित होते..

अमृत भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये:
अमृत भारत एक्सप्रेस ही गाडी प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये एर्गोनॉमिकली डिझाईन केलेले बर्थ, स्वयंचलित दरवाजे, उन्नत स्वच्छता सुविधा, आणि कवच या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.
या उद्घाटन सोहळ्यात दोन नव्या गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले:
१. बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेस
२. अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) अमृत भारत एक्सप्रेस
महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी सांगितले की, “हडपसर रेल्वे स्थानकावर अमृत भारत एक्सप्रेसचे आगमन हे पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. भारतीय रेल्वेच्या या आधुनिक सेवेमुळे पुणे आणि बनारस या दोन सांस्कृतिक शहरांमधील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...

आरक्षण उप वर्गीकरणाला परिषदेचा विरोध – ॲड. जयदेव गायकवाड

वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत - ॲड....

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...