पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

Date:

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी यांनी आज तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला तातडीने अंमलबजावणी करत ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश दिले.

या पाहणीदरम्यान तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी (Chemical Oxygen Demand) व बीओडी (Biochemical Oxygen Demand) यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात उभारण्यात आलेल्या एसटीपी (Sewage Treatment Plant) प्रकल्पांची कार्यक्षमता तपासून, प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित निकषांनुसारच तलावात सोडले जाईल यासाठी काटेकोर देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच पुणे महानगरपालिकाच्या हद्दीपर्यंतचे नाले, पाणीप्रवाह व संबंधित यंत्रणांची सखोल पाहणी करण्यात आली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, अडथळे तसेच अनधिकृत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तलावात थेट जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी स्वतंत्र नाले उपयोजना (Drainage Diversion) प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले.

पाषाण तलावाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले….

  • एसटीपी प्रकल्प नियमित व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवून त्यांच्या कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा करणे
  • नाल्यांमधील सांडपाणी कोणत्याही परिस्थितीत थेट तलावात जाणार नाही, याची खात्री करणे
  • तलाव परिसरात विशेष स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविणे
  • पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून पारदर्शक अहवाल प्रणाली कार्यान्वित करणे
  • स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून व्यापक जनजागृती मोहीम राबविणे

या पाहणी दरम्यान नगरसेविका रोहिणी चिमटे व नगरसेविका मयुरी कोकाटे उपस्थित होत्या. तसेच प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (पर्यावरण) सौ. किशोरी शिंदे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सहभाग घेतला.

महापौर नागपुरे यांनी स्पष्ट केले की, पाषाण तलावाचे संवर्धन व प्रदूषणमुक्ती ही शहराच्या पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून, सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अल्पावधीत ठोस व दृश्यमान परिणाम साध्य करावेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि....

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना,...

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा स्पष्ट इशारा आयटी...

शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,बच्चू कडू निश्चित,झिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल

मुंबई -विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू...