‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Date:

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी

पुणे, दि. ३० एप्रिल २०२६ :
उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता, बसस्थानकावर विक्री होत असलेली ‘नाथजल’ची एक लिटरची थंड पाण्याची बाटली २० रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना देत, पुढे १५ रुपयांची बाटली अधिक दराने विक्री केल्यास विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला.


तसेच, लोणावळा बसस्थानकावर येणाऱ्या काही बसफेऱ्या बसस्थानकात न येता पुढे जात असल्याची तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली. या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे, वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बसस्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानुसार, कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले.
या पाहणीदरम्यान त्यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी बसस्थानकातील कर्मचाऱ्यांशी तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रवासी सेवेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता वल्लभनगर बसस्थानकाची...

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या...

बनारस – पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे हडपसर रेल्वे स्थानकावर महापौर मंजुषा नागपुरेंनी केले स्वागत..

पुणे: भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना,...

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा स्पष्ट इशारा आयटी...